BJS College

भारतीय जैन संघटना संचालित
प्राथमिक , माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालय ,पिंपरी.

Shantilal

प्रवेश

उच्च माध्यमिक विभाग ११ वी व १२ वी

(माध्यम मराठी व विज्ञान इंग्लिश)



इ.११ वी प्रवेश पद्धती :

महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहरात इ.११ वी ची प्रवेश प्रक्रिया सन १९९६-९७ पासून केंद्रीय प्रवेश पद्धतीने सुरुवात करण्यात आली होती. सन २०१४-१५ पासून इ.११ वी चे प्रवेश ऑनलाईन केंद्रीय प्रवेश पद्धतीने करण्यात येत आहेत. इ.११ वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांनी, इ.११ वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश सुरु झाल्यानंतर इ.११+ वी ऑनलाईन प्रक्रिया माहिती पुस्तिकेत दिलेल्या सूचना वाचून त्यानुसार इ.११ वी साठी अर्ज करावा.

इ.१२ वी प्रवेश पद्धती :

  • १) इ.११ वी मध्ये पिंपरी चिंचवड बाहेरील विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना, या विद्यालयात जागा शिल्लक असल्यास गुणवत्तेनुसार इ.१२ वी साठी प्रवेश दिला जातो.
  • २) पिंपरी चिंचवड परिसरात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना या विद्यालयात जागा शिल्लक असल्यास गुणवत्तेनुसार
    • खालील अटीवर प्रवेश दिला जातो:
    • १) शाखा बदलून मिळणे
    • २) सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय घरापासून लांब असणे .
    • ३) पालकांची बदली होणे.
    • ४) वैद्यकीय कारणास्तव राहत असलेल्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालये बदलून मिळणे.
    • ५) विद्यार्थांच्या राहण्याचा पत्ता बदलणे.
    • ६) इ.१२ वी मध्ये विद्यार्थांस बोर्ड बदलायचे असल्यास.

टीप : या विद्यालयात इ .११ वी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांना विद्यालयात संपर्क साधल्यानंतर पूर्ण मार्गदर्शन करून प्रवेशासाठी मदत केली जाते.