BJS College

भारतीय जैन संघटना संचालित
प्राथमिक , माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालय ,पिंपरी.

Shantilal

स्थापना

पिंपरी–चिंचवड ह्या औद्योगिक परिसरामध्ये २५ ऑक्टोबर १९९३ रोजी संत तुकारामनगर,पिंपरी येथे ‘भारतीय जैन संघटना संचलित माध्यमिक विद्यालयाची ’ स्थापना झाली. भूकंपग्रस्त, अनाथ, निराधार व बहुजन समाजातील, तळागाळातील मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा व त्याचे जीवनमान उंचावे या ध्येयाने प्रेरित होऊन सुसंस्थापित झालेल्या या विभागाची वाटचाल अधिक उंचावत आहे.

अनाथ व मेळघाट येथील अदिवासी मुलांना वाघोली येथे मोफत शिक्षण दिले जाते. गुजरात मध्ये २६ जानेवारी २००१ रोजी झालेल्या भूकंपामुळे ८०% खेड्यामधील घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. तेथे संघटनेने जाऊन ३०० शाळा उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण केले. या सारख्या अनेक नैसर्गिक आपत्ती मध्ये आमची भारतीय जैन संघटना तत्परतेने मदत पोहचवते. या प्रमाणे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. २००५ मध्ये काश्मीर येथे झालेल्या भूकंपामध्ये मोलाचे मदत कार्य संस्थेने केले आहे. व तेथील ५०० भूकंपग्रस्त मुलांची वाघोली येथे सोय केली.

दर वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर राबवले जाते. सन २००८ मध्ये बिहार या राज्याला पुराने वेढले असता त्या ठिकाणी जाऊन सहा महिने मदत कार्य चालू ठेवले. अंदमान निकोबार येथे त्सुनामी ग्रस्त भागात शाळा उभारल्या. ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सुमारे २५० मुले वाघोली येथील शैक्षणिक संस्थेत मोफत शिक्षण घेत आहेत. या वर्षी शेतकर्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सर्व समाजाला भेडसावणारा ठरला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अनाथ मुलांचे संगोपन व शिक्षण करण्याची जबाबदारी संस्थेने स्विकारली.

आज वाघोली येथील संस्थेत ६५० मुले – मुली गुण्यागोविंदाने शिक्षण घेत आहेत. या वर्षी मुलांची निवासी व्यवस्था हा क्रांतिकारी निर्णय ठरला, मुलांच्या स्वागत समारंभास मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये ‘शांतीलाल मुथ्था फाउंडेशन’ च्या सहकार्याने मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तसेच भारतीय जैन संघटनेने १३४ जेसीबी घेऊन बुलढाणा जिल्हा दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.